Top News

महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड

संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा, सेतू चालकांच्या समस्यांसाठी मुविकोराज कोल्हे घेणार प्रयत्न

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, उपाध्यक्षपदी पंकज वसंत कोळी, सचिव पदी महेश राजगोपालजी राठी, आणि कार्याध्यक्ष पदी इरफान जाहीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा नाशिक येथे झालेल्या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सागर रमेश खराटे, सचिव विकास शामराव शिरसाठ, कार्याध्यक्ष आकाश सुभाष उसराटे, आणि खजिनदार सुशील कैलास गणोरे यांचा समावेश आहे. निवडीनंतर शेख यांनी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले.

मुविकोराज कोल्हे यांनी शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना, "संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता भविष्यात जळगाव शहरातील महाऑनलाईन (सेतु केंद्र) आणि आधार सेवा केंद्र संचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू," असे सांगितले.

कोल्हे यांच्या निवडीचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात आले असून, ते जळगावच्या सेतु चालकांसाठी एक सशक्त नेतृत्व प्रदान करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने