प्रचार रॅलीत फुलांची उधळण; जनतेने समस्यांचा वाचला पाढा
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांना विविध समाजातील लोकांकडून जोरदार समर्थन मिळू लागले आहे. शहरातील डॉ. आंबेडकर नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा, बालाजी पेठ, बागवान मोहल्ला, भवानी पेठ या भागांतील नागरिकांनी त्यांना सामूहिक पद्धतीने पाठिंबा दिला आहे. यासह, प्रचार रॅली दरम्यान डॉ. अश्विन सोनवणे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
रॅलीमध्ये, डॉ. सोनवणे यांना मिळालेल्या समर्थनासोबतच, अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यात मूलभूत सुविधा, बेरोजगारी, शालेय आणि आरोग्य सेवांची स्थिती यासारख्या मुद्दयांचा समावेश होता. या समस्यांवर चर्चा करून डॉ. सोनवणे यांनी नागरिकांना त्यांच्या प्रत्येक अडचणीवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती: प्रचार रॅलीत अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे (मोगली बाबा), भगवान सोनवणे, मंगलाताई सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी, जित सोनवणे, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव शहराच्या आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. अश्विन सोनवणे यांचा प्रचार जोरदार सुरू असून, त्यांना मिळालेल्या समर्थनामुळे शहरातील वातावरण चांगलेच उत्साही बनले आहे.
टिप्पणी पोस्ट करा