वडली येथे घोड्यावरून मिरवणूक; भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळके-विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे पार पडल्याने स्थानिक जनता त्यांच्यावर खूश आहे. यात रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांची इमारत आणि जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी ते कटिबद्ध असून शेतकरी वर्गाला दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी विटनेर येथे सौर ऊर्जा प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वडली गावात घोड्यावरून मिरवणूक
वडली येथे गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत त्यांचे भव्य स्वागत झाले. यावेळी ६० ज्येष्ठ भाविकांनी आणि भजनी मंडळाने दिंडी काढून त्यांना आशीर्वाद दिला.
प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात जळके-विटनेर परिसरातील विकास कार्ये आणि लोकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत त्यांना प्रचंड जनाधार मिळणार असल्याचे दिसून येते.
टिप्पणी पोस्ट करा