Top News

भारत जोडो व सिव्हिल सोसायटीतर्फे तुषार गांधी यांच्या सभेचे आयोजन

जळगावमध्ये १६ नोव्हेंबर रोजी आयोजित सभा; तुषार गांधी देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणावर देतील मार्गदर्शन

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो समूह आणि सिव्हिल सोसायटीच्या वतीने शनिवारी, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री. तुषार गांधी यांची एक महत्त्वपूर्ण सभा आयोजित केली आहे. ही सभा जळगावमधील सद्गुरू एज्युकेशन सोसायटी, बीपी एड कॉलेज प्रांगणात, खाॉजामिया जवळ होईल.

तुषार गांधी हे महात्मा गांधींचे पणतू असून, 'Let's Kill Gandhi' आणि 'Lost Diary of Kastur My Baa' या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. ते 'गांधी रिसर्च फाउंडेशन'चे विश्वस्त असून अनेक गांधीवादी संस्था आणि आंदोलने यांच्याशी जोडलेले आहेत. सध्याच्या लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी देशभर चालू असलेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

भारत जोडो समूह हा समाजातील दलित, शोषित घटकांचे आणि सामान्य नागरिकांचे आवाज उठवणारा एक महत्त्वाचा सामाजिक चळवळीचा समूह आहे. या समूहाचा उद्देश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकशाही आणि संविधान रक्षणाची भूमिका बजवणे आहे. भारत जोडो समूहाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

सभेचे आयोजन करणाऱ्यांनी, भारत जोडो समूहाचे समन्वयक अविनाश पाटील, वासंती दिघे, जयसिंग वाघ, सतिश सुर्वे, फईम पटेल, अमोल कोल्हे, रमेश भोळे, हर्षल पाटील, अजय पाटील आणि आरिफ देशमुख यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

तारीख: १६ नोव्हेंबर २०२४, शनिवारी
वेळ: सायं. ६ वाजता
स्थळ: सद्गुरू एज्युकेशन सोसायटी, बीपी एड कॉलेज प्रांगण, खाॉजामिया जवळ, जळगांव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने