जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि. ५) आपल्या प्रभाग क्रमांक १८ मधील प्रचाराला संतोषी माता मंदिर येथून प्रारंभ केला. या प्रचार दौऱ्यात त्यांनी मास्टर कॉलनीत ‘हम सब एक है’ चा नारा देत सर्वधर्मीय ऐक्य आणि जातीय सलोखा जपण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
जयश्री महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करताना, शहराचा सर्वांगीण विकास, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षा, आणि सर्वधर्मसमभाव यावर भर दिला. परिसरातील महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत जयश्री महाजन यांनी स्थानिक नागरिकांची मने जिंकली. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा