Top News

जळगाव शहर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मेहरुण मधील जय भवानी शिक्षण मंडळ, मेहरुण संचलित सौ.कमलादेवी गोपालकृष्ण मणियार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ७.१५ ला त्यांनी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी जळगावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने