जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या अधिपत्याखाली 13 वर्षांच्या मुला-मुलींच्या महाराष्ट्र संघाची निवड चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या निवड चाचणीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 4 मुले आणि 4 मुलींच्या खेळाडूंना सहभागी करण्यात येणार आहे.
निवड चाचणीचे आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनतर्फे करण्यात आले होते. 8 नोव्हेंबर 2024 रोजी एम.एम.महाविद्यालय पाचोरा येथील बास्केटबॉल मैदानावर ही निवड चाचणी घेतली गेली. या चाचणीच्या उद्घाटन प्रसंगी एम.एम.महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन नानासाहेब वि.टी.जोशी यांनी श्रीफळ फोडून निवड चाचणीचे उद्घाटन केले. यावेळी एम.एम.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.बी.एन.पाटील, प्राचार्य श्री.शिरीष पाटील, क्रीडा संचालक प्रा.श्री.गिरीश पाटील, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. निवड चाचणीमध्ये खालील खेळाडूंची निवड करण्यात आली: मुले समर्थ अहिरे, भाग्येश पाटील, ब्रिजेश पाटील, विनायक आहुजा, आरोही पाटील, वीरा जोशी, वरदा चौधरी, लिशिका गायकवाड निवड समितीमध्ये प्रा. गिरीश पाटील, आशिष पाटील, जावेद शेख, भावेश पाटील आणि जितेंद्र शिंदे यांचा समावेश होता. निवडलेल्या खेळाडूंना पुढील चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संघात स्थान मिळाल्यावर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येईल.
टिप्पणी पोस्ट करा