जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातील बहुजन, दलित, आदिवासी, वंचित घटक, महिला आणि शेतमजूर यांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या डॉ. संभाजीराजे आर. पाटील यांना शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
"शबरी माता संघटना" चे प्रदेशाध्यक्ष श्री दीपक बर्डे यांनी जाहीर पाठींब्याचे पत्रक जारी करत, तालुका अध्यक्ष श्री नागो भिवा भिल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर डॉ. संभाजीराजे यांची प्रचार रॅलीत भेट घेऊन त्यांना समर्थन दिले.
संघटनेचे पदाधिकारी यावेळी म्हणाले, "आजवर सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे या समाजाच्या घटकांना योजनांचा लाभ मिळवून दिला गेला नाही, परंतु डॉ. संभाजीराजे पाटील हे एक चांगले, उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार असून तेच या घटकांना न्याय मिळवून देतील." त्यांनी आदिवासी, दलित, कष्टकरी आणि महिलांना डॉ. पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
शबरी माता संघटना चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉ. संभाजीराजे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा देणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनेच्या या पाठींब्यामुळे एरंडोल पारोळा भडगाव मतदारसंघात मोठे परिवर्तन होण्याची दाट शक्यता लोकांमधून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा