आमदार मंगेश चव्हाण यांचे दरेगावात जंगी स्वागत, गावक-यांचा विजयाचा निर्धार!
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी ,महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश दादा चव्हाण प्रचारा निमित्त ग्रामीण भागाचा दौरा करत असून त्यांचं ठीक ठिकाणी अभूतपूर्ण स्वागत होत आहे. असंच स्वागत त्यांचे माजी खासदार व माजी आमदार राहिलेले उन्मेश पाटील यांच्या गावात झाले आहे. भव्य, दिव्य व जंगी स्वागत गावकऱ्यांनी करत मंगेश चव्हाण यांच्या जयजयकारच्या घोषणाने गाव दुमदुमले होते. मंगेश चव्हाण यांनी आपला विकासरूपी झेंडा दरेगावात रोवला आहे, त्यामुळेच आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दरेगाव वासियांयांनी डोक्यावर घेतले आहे. माजी खासदार व आमदार यानी आपल्या गावाला देखील निधी दिला नाही ते यानिमित्तने आता उघड झाले आहे. दरेगावात थे ग्रामदैवत भवानी माता मंदिराजवळ खुले सभामंडप बांधकाम करणे - 15 लाख, नवीन अंगणवाडी बांधकाम करणे - 11.25 लाख, दरेगाव येथे चौक सुधारणा व अनुषंगिक कामे करणे - 10 लाख, दरेगाव तांडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख ही कामे झाली असून दरेगाव शिवारीतील 683 शेतकर्यांच्या खात्त्यात रु. 1,42,61,480 चा निधी विविध जमा झाला आहे.
तर प्रगतीपथावर असलेली विकास काममध्ये - दरेगाव पाणीपुरवठा योजना - 1 कोटी 19 लाख,दरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे - 25 लाख, दरेगाव येथे नवीन वर्गखोली बांधकाम करणे - 12.15 लाख. दरेगाव येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसविणे - 5 लाख यांचा समावेश आहे. तर काही विकास कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये , दरेगाव येथे सभामंडप बांधकाम करणे - 20 लाख. दरेगाव येथे मारोती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे - 20 लाख. दरेगाव येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसविणे - 10 लाख. राज्य मार्ग -25 हायवे ते रामनगर रस्ता सुधारणा करणे 3 कोटी.एखाद्या माजी आमदार, खासदाराच्या गावात एवढ्या मोठ्या संख्येने आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेली विकास कामे ही निश्चितच कौतुकास्पद असून गावकऱ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे स्वागत केले आहे. कोणताही व्यक्ती द्वेष न ठेवता आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सरळ हाताने दरेगावात विकास कामे मंजूर केले आहेत. त्यामुळेच दरेगावची जनता आमदारांच्या विकास कामांच्या प्रेमात पडले आहे व त्यांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.
---------------------------------------------------
“ *ज्या व्यक्तीने स्वतःच्या गावात विकास कामे केली नाही,तो तालुक्याचा काय विकास करणार ? त्यांना विकासावर बोलायचं नैतिक अधिकार नाही. जनता जनार्दन विकास कामांच्या पाठीमागे आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे* ” .
:- आमदार मंगेश दादा चव्हाण
टिप्पणी पोस्ट करा