सुरक्षेचा संदेश देत स्थानिक पोलीस व ITBP जवानांनी केले शक्तीप्रदर्शन; नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास वाढ
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी व अमित कॉलनीमध्ये आज सकाळी ITBP जवानांच्या सहभागासह पोलीस दलाकडून पतसंचलन करण्यात आले. स्थानिक नागरिकांना सुरक्षा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या पतसंचलनात जवानांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिसरात खास वातावरण निर्माण करण्यात आले.
जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतून सुरू झालेल्या या पतसंचलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुप्रीम कॉलनी व अमित कॉलनीतून जात असताना नागरिकांनी जवानांचे स्वागत करत त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. या आयोजनामध्ये विविध शाखांतील पोलीस कर्मचारी, स्थानिक रहिवासी व नागरिक सहभागी होते.
जळगाव स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "अशा पतसंचलनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक भावना निर्माण होतात. जवान व पोलीस यांच्यातील एकात्मतेचा संदेश यामुळे नागरिकांपर्यंत पोहोचतो."
सुरक्षा व्यवस्थेत योगदान देणाऱ्या ITBP जवानांच्या समर्पणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा