Top News

धारदार शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या चोरी करणारी टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना घातल्या बेड्या 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील संशयित टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवून बकरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना आज जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या घातलेल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडून रोकड सह व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

 जिल्ह्यात बकऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक तयार करुण आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. भवाळी, ता. चाळीसगाव येथील चेतन गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड व ७ बकऱ्या चोरी केली होती. 

चोरीचा माल जप्त, आरोपींना अटक
चोरलेल्या जनावरांची विक्री करून आलेली रक्कम वाटून घेतल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी १,३५,०००/- रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने