आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार सुरेश भोळे यांनी सुरू केली रणनीती, मतदारसंघात वाढवली कार्यकर्त्यांची सक्रियता व तगडा जनसंपर्क मोहिमेचा प्रारंभ
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून व जनतेशी संवाद साधत, भोळे यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी विविध विकासकामांवर भर देउन मतदारसंघातील लोकांशी नाळ मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सध्या सुरु असलेल्या जनसंपर्क मोहिमेत आमदार भोळे यांनी मतदारांना आपल्या कार्यकाळातील प्रगतीचा आढावा दिला आहे. आगामी निवडणुकीसाठी त्यांच्या अपेक्षा व योजना स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर, त्यांनी कार्यकर्त्यांना मतदारांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचे व मतदारसंघातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
आमदार सुरेश भोळे यांच्या या तयारीला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो. या आगामी निवडणुकीत त्यांना कितपत यश मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा