जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची कामगिरी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I दिनांक १५ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंपावरील एन एन वाईन शॉपवर काही इसमांनी दहशत माजवून वाईन शॉपचे काऊटर मधील ५ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम काढून जबरीने घेवून गेले असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जोरदार कामगिरी करुन गून्हा उघडकीस आणला.
त्यावर बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते.
नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुजराल पेट्रोलपंपा वरील N.N. वाईन शॉपवर दहशत माजविणारे आरोपी हे पाळधी ता. धरणगाव येथील साई मंदिरात असल्याची बातमी मिळाली, त्यावरून नमुद पथक हे खाजगी वाहनाने साई बाबा मंदिर पाळधी येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून तिथे २ इसमांना पकडून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) सचिन अभयसिंह चव्हाण, वय २६, रा.शंकर आप्पा नगर पिंप्राळा जळगाव, २) अक्षय नारायण राठोड, वय २२, रा.यश नगर पिंप्राळा जळगाव यांना ताब्यात घेवून त्यांनी जिल्हापेठ पो.स्टे. CCTNS NO ३०८/२०२४ भा. न्या. संहिता ३०९ (६) या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडून ६८५००/- रु. रोख व गुन्ह्यात वापरलेली बुलेट ताब्यात घेवून, सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी जिल्हापेठ पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा