Top News

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत पोक्सो ॲक्टवर कार्यशाळा संपन्न

कायदा व समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ ॲड. रवींद्र सिंग पाटील यांचे व्याख्यान 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत नुकतीच *पॉक्सो ॲक्ट (बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मुलांच्या सुरक्षेशी संबंधित कायदेशीर बाबी, हक्क आणि जबाबदाऱ्या याबद्दल जागरूक करणे हा होता.

या कार्यशाळेसाठी कायदा आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ ॲड.रवींद्र सिंग पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच ॲड. कीर्ती पाटील यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. त्यांनी पोक्सो कायद्याचे विविध पैलू, बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कायद्याच्या मर्यादेत कसे कार्य करावे, गैरवर्तन ओळखणे, आणि त्याबाबत त्वरित रिपोर्ट करणे यावर मार्गदर्शन केले. या सत्रात सहभागींचे प्रश्न आणि शंकांचे निरसन करणारे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले. स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

ही कार्यशाळा उपस्थितांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसादाने स्वीकारली, तसेच त्यांना दिलेली माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले. शाळेच्या प्रशासनाने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा चौधरी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने