Top News

पर्यायी नाला नसल्यामुळे पावसाचे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन, सावखेडा शहरातील कोल्हे हिल्स परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरीक त्रस्त 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरात कुंभार खोरे वनविभागातील पावसाचे पाणी परिसरात शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती अशी आहे की, जळगाव शहरातील कोल्हे हिल्स भागात असलेले कुंभार खोरे वनविभागातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी नाल्याची व्यवस्था नसल्यामुळे, पावसाच्या पाण्यामुळे श्री महादेव मंदिर परिसर, सावखेडे शिवार, कोल्हे हिल परीसर पाणी साचल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पृथ्वीलक्ष्य बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजसेविका सरिता कोल्हे, सरपंच संतोष पाटील, जितेंद्र करोसिया यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनातील समस्येचा गंभीरतेने विचार करून, पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना जलद मदतीची अपेक्षा आहे आणि त्यांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना होईल अशी आशा आहे. यावेळी सर्व सावखेडा शिवारातील रहिवासी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने