Top News

कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी दिले सरपंचांना निवेदन



जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरात पावसाचे पाणी साचल्याने त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पक्का नाला बनविण्याच्या संदर्भात आज नागरिकांनी सरपंच संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. 

सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील न्यू लक्ष्मी नगरपरिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी श्री महादेव मंदिर परिसर, न्यू लक्ष्मी नगर ते माउली नगरासह विविध परिसरात पक्का नाला बांधलेला नाही. यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या काळात येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरते आणि त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येच्या निराकरणासाठी पक्का नाला बनविणे अत्यावश्यक आहे. तरी आपण, ग्रामसभेत या समस्येवर चर्चा करून लवकरात लवकर पक्का नाला बनविण्याचा ठराव घेण्याची विनंती आहे. यामुळे येथील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण होईल अशा संदर्भात आज निवेदन दिले आहे. यावेळी पृथ्वी लक्ष बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष नंदलाल बंटी सोनवणे, सचिव ललित सोनवणे, गजानन वाघ यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने