Top News

आमदार सुरेश भोळे आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

चार दिवसीय जळगावात आमदार सांस्कृतिक महोत्सव चालणार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगांव शहराचे लाडके आमदार सुरेश भोळे यांच्यावतीने आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट या दरम्यान होणार असल्याची माहिती आज आमदार सुरेश भोळे यांनी बोलताना सांगितले.

लेझीम पथक व ढोल ताशा स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात होणार 
महोत्सवानिमित्त रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सागर पार्क येथे ढोल ताशा व लेझीम पथक महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार महोत्सवामध्ये अनेक गणेश मंडळाचे ढोल ताशा पथक तसेच लेझीम पथक सहभागी होणार आहेत. याशिवाय महोत्सवात पथनाट्य देखील सादर होतील. यासाठी अनेक संघांनी नोंदणी केली असून तरुणांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव व बहरण्यासाठी संधी मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक आ. राजू मामा भोळे यांनी सांगितले आहे. त्याच प्रमाणे दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना पाककला, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, भजन, मंगळागौर समूहगीत, समूह,नृत्य, बालनाट्य,साडी वेशभूषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होत असून जास्तीत जास्त संख्येने महोत्सवात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने