Top News

पॅरीस ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगावात जल्लोष

 

फटाके व भारतीय ध्वज फडकवून केला जल्लोष साजरा 

जळगाव अपडेट न्युज, निखिल वाणी I पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंनी नेमबाजी स्पर्धेत विजय मिळविल्याने जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे फटाके फोडून व भारतीय ध्वज फडकवून सर्व क्रीडा खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. 

पॅरिस येथे ऑलिंपिक नेमबाज स्पर्धेतील खेळाडूंनी पदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. भारताकडून मनू भाकर ही पहिली महीला खेळाडू ठरली आहे. जळगावात आज एकलव्य शूटिंग अकॅडेमीतर्फे फटाक्यांची आतषबाजी करत सर्व विद्यार्थ्यांची जल्लोष साजरा केला आहे. 

एकलव्य क्रीडा संकुल संचालित एकलव्य शूटिंग आकॅडेमी तर्फे पॅरिस ओलंपिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर, सरबज्योतसिंग, स्वप्नील कुसाळ यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल व त्यांच्या या यशाबद्दल एकलव्य शूटिंग अकॅडेमीच्या सर्व खेळाडूंनी भारतीय ध्वज फडकावत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

 याप्रसंगी एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, एकलव्य शूटिंग अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक सागर सोनवणे, मू. जे. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दुबे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पाटील, एकलव्य बास्केटबॉल अकॅडेमीचे प्रशिक्षक जितेंद्र शिंदे, एकलव्य टेबलटेनिस अकॅडेमीचे प्रशिक्षक विजय विसपुते, एकलव्य बॅडमिंटन अकॅडेमीचे प्रशिक्षक शेखर सोनवणे एकलव्य मल्लखांब अकॅडेमीचे प्रशिक्षक नरेंद्र भोई व एकलव्य क्रीडा संकुलातील विविध क्रीडा प्रकारातील सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी सर्व खेळाडूंनी भारत मातेचा जयघोष करत पॅरिस ओलंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने