Top News

🛕 श्री साई धाम मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा; पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वसा समाजसेवा फाउंडेशनच्या वतीने कोल्हे हिल्स, वाघनगर परिसरातील श्री साई धाम मंदिराचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांची सुरुवात १२ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी दोन वाजता श्री साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे. भाविकांच्या मोठ्या सहभागात संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार असून, हा सोहळा सायंकाळी सात वाजेपर्यंत पार पडणार आहे.

१३ ऑक्टोबर, सोमवार रोजी लहान मुलांसाठी मॅजिक शो व जादूचे प्रयोग हे विशेष आकर्षण असेल. तसेच महिलांसाठी ‘हेड पैठणीचा होम मिनिस्टर’ हा रंगतदार कार्यक्रम सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे.

१४ ऑक्टोबर, मंगळवार रोजी नागरिकांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व कीडझोन हे आकर्षण ठरणार असून, सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असेल.

कार्यक्रमांच्या मालिकेत १५ ऑक्टोबर, बुधवार रोजी भक्तीमय वातावरणात ‘श्री खाटू श्यामजी व एक शाम साई के नाम’ हा विशेष भक्तिसंगीत कार्यक्रम सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत होईल. त्यानंतर गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.

समारोपाच्या दिवशी १६ ऑक्टोबर, गुरुवार रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी साडेसात वाजता श्री साईबाबांची महाआरती होईल.

या पाच दिवसीय उत्सवात सहभागी होऊन भक्तांनी कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री साई धाम मंदिर व आयोजक मंडळाने केले आहे.

📍 कार्यक्रमाचे ठिकाण: श्री साई धाम मंदिर, कोल्हे हिल्स, वाघनगर परिसर, जळगाव.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने