जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात 2020 साली दाखल झालेल्या चर्चित हनीट्रॅप प्रकरणात आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची जळगाव येथील पाचवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मिलिंद एम. निकम यांच्या न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणात फिर्यादी अभिषेक शांताराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 16 ऑक्टोबर 2020 रोजी आरोपी शाकंभरी सुर्वे हिने त्यांना फोन करून “मला तुम्हाला भेटायचे आहे” असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती आणि तिचे साथीदार फिर्यादीच्या कार्यालयात भेटले. त्यावेळी त्यांनी फिर्यादीला सांगितले की, “तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम मला दिले गेले आहे, पण मला तुमचे नुकसान करायचे नाही. काही विरोधक तुम्हाला राजकारण आणि सामाजिक स्तरावरून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे सांगण्यात आले होते.
या घटनेनंतर फिर्यादीने संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या खटल्याची सुनावणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. अखेर 8 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना सबळ पुराव्याअभावी आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. वडवी यांनी तर आरोपी मनोज वाणी यांचे वकील ॲड. कुणाल पवार यांनी बाजू मांडली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मनोज वाणी यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रकरणात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा