शासकीय कार्यालयातील ५९ वाहने लिलावासाठी ठरवली, 2. १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात विकण्यास शासनाची मान्यता, आरटीओ अधिकारी चकोर यांच्या उपस्थितीत वाहनांची पाहणी, खासगी कंपनीमार्फत लिलाव प्रक्रिया सुरू
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इतर शासकीय कार्यालयांमधील एकूण ५९ वाहने, ज्यात ८ वाहनं रुग्णालयाची आणि ५१ इतर कार्यालयांची आहेत, यांची पाहणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. शासनाने या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, आरटीओ विभागाच्या अधिकारी वाहनांची किंमत ठरविणार आहेत.
शासनाने १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेली वाहने भंगारात विकण्यास मान्यता दिली आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारी आरटीओ अधिकारी श्री. चकोर यांच्या उपस्थितीत या वाहनोंची पाहणी करण्यात आली.
वाहनांचा लिलाव प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत पार पडेल. आरटीओ विभाग वाहनाची किंमत ठरवून, लिलावासाठी तयार करणार आहे. यावेळी सामान्य रुग्णालयाचे सेवा अभियंता श्री. विजय नारखेडे आणि कार्याध्यक्ष श्री. सुभाष प्रजापती उपस्थित होते.
या प्रक्रियेचा उद्देश जुनी आणि अनुपयोगी वाहने हटवून शासकीय यंत्रणेतील कार्यक्षमतेत सुधारणा करणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा