Top News

नगररचना विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार करणार - अमोल कोल्हे

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी – जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप एकापाठोपाठ महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक महासभेत करत आहेत. तसेच सामाजिक संघटनांनाही नगररचना विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आहे. छावा मराठा युवा महासंघ देखील नगररचना विभागातील भोंगळ कारभारविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे. मागील वर्षी, छावा मराठा युवा महासंघाच्या निवेदनावरून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

कालच, नगररचना विभागातील एक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडचणीत आणला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे म्हणाले, "ही एक दुर्दैवी घटना आहे, परंतु यापेक्षाही नगररचना विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार सुरू आहे. कमी उंचीची मंजुरी घेतल्यावर प्रत्यक्षात इमारतीची उंची वाढवून मजले घातले जातात. त्यासाठी लाखो रुपये लाच देऊन कामे होत आहेत."

कोल्हे यांनी पुढे सांगितले की, लवकरच रिंगरोड वरील एका आर्किटेक्टसंबंधी कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. तसेच, या गैरप्रकारांच्या संदर्भात पूर्ण पुराव्यानिशी लवकरच उघडकीस आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने