Top News

डॉ. संभाजीराजे पाटील यांचा वाढता प्रतिसाद: जनतेची साथ, विरोधकांमध्ये धडकी

एरंडोल मतदार संघात डॉ. संभाजीराजे यांना प्रचंड जनसमर्थन; वैद्यकीय सेवेतून जनतेशी नाते घट्ट

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. संभाजीराजे पाटील यांना तालुक्यातील गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदारसंघात सातत्याने संपर्कात राहून त्यांनी मतदारांच्या मनात विश्वास आणि आपलेपणा निर्माण केला आहे. यामध्ये एरंडोल, कासोदा, पारोळा या मतदार संघातील नागरिकांना त्यांनी आपलेसे केले आहे.

डॉ. संभाजीराजे पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून समाजसेवेसाठी ओळखले जातात. त्यांच्या 'डॉ. संभाजीराजे फाउंडेशन'च्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो मोतीबिंदूच्या ऑपरेशन मोफत करण्यात आले आहेत. विशेषतः कोरोना काळात जवळपास तीन ते चार हजार मोफत प्रसूती सेवा देऊन त्यांनी जनतेचा आशीर्वाद मिळवला आहे. या सामाजिक कार्यामुळे मतदार संघातील सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत उभी राहिली आहे.

विरोधकांसाठी धोक्याची घंटा
मतदार संघात मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याची चर्चा आहे. जनतेतून उमटणाऱ्या या प्रेमामुळे विरोधकांची चिंता वाढली असून डॉ. संभाजीराजेंना आमदार म्हणून बघण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेत प्रबळ झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने