विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा:
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I चाळीसगाव, I शहरातील दूरदराजच्या भागातील नागरिकांशी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद साधण्यात आला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या परिसराचा विकास गेल्या पाच वर्षांत एकनिष्ठ प्रयत्नांनी सुरू झाला आहे, आणि त्याचेच परिणाम आज दिसत आहेत. सुधारणा झालेल्या या भागातील नागरिकांनी आपल्या गरजा, अपेक्षा तसेच आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले.
आदर्श नगर, तेजस कोणार्क, गोत्रे मळा, प्रभू रामचंद्र नगर, सावरकर नगर, आणि डेराबर्डी या भागातील नागरिकांशी संवाद साधत, अ. क्र. ०२, कमळ चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा मला निवडून देण्याची विनंती केली.
संपूर्ण क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील, असे यावेळी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. संपूर्ण संवाद दौऱ्याचे कृतज्ञतेने स्वागत करत, चाळीसगाववासीयांनी आपले योगदान द्यावे.
टिप्पणी पोस्ट करा