जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भाऊबीजेच्या पावन निमित्त, ज्ञानभारती फाउंडेशनतर्फे एक अनोखा स्नेहोत्सव आयोजित करण्यात आला. आज दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ‘आश्रय माझे घर’ मतीमंद मुलांचे आश्रयस्थान, सावखेडा येथे हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये उपस्थित मुलांना ओवाळून गोडधोड खाऊ देण्यात आला.
कार्यक्रमात कै. छगनराव परशराम नाईक व कै. रेवती छगनराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलांसाठी खास स्नेह भोजनाची तयारी करण्यात आली होती. मसाला डोसा, चायनीज राईस, चटणी, मोतीचूर लाडू, मोहनथाळ, पेढे, बत्ताशे, नारळ, चॉकलेट, करदोडे आदी पदार्थांचे भरगोस मेजवानी देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, किशोर सूर्यवंशी, नितीन महाजन, व डॉ. नयना झोपे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सामाजसेवक चंद्रशेखर कापडे, ज्ञानेश्वर कुमावत, रेखा पाटील, अनिता सूर्यवंशी, नुतन सूर्यवंशी, कृतिका सूर्यवंशी, शिवानी पवार, भारती कुमावत (ज्ञानभारती फाउंडेशन अध्यक्षा), यामिनी महाजन, सौम्या पवार, चिराग महाजन, आदित्य कापडे, रितिक कुमावत, तेजस कुमावत, नील हिंगोणेकर या सर्वांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन शोभा वाढविली.
टिप्पणी पोस्ट करा