Top News

जळगावातील नवनाथ नगरातील नागरिकांनी ललित घोगले यांचे पॅम्प्लेट दाखवून केला प्रचार

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; कार्यक्रमात उत्साही घोषणा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांची वाघ नगरातील कोल्हे हिल्स परिसरात असलेले नवनाथ नगर येथे कॉर्नर मिटिंग आयोजित करण्यात आली. यावेळी कोल्हे हिल्स परिसरातील नवनाथ नगर येथील शिव मंदिर येथे दर्शन घेऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली.

बैठकीदरम्यान, येथील नागरिकांनी ललित घोगले यांचा सत्कार करत, त्यांच्या प्रचारासाठी पॅम्प्लेट दाखवून स्वतः प्रचार करण्याचा निर्धार केला. याप्रसंगी नागरिकांनी ‘ललित भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!’ आणि ‘वंचित आघाडीचा विजय असो, सिलेंडरला मत, विकासाला मत’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी सभागृहात जल्लोष निर्माण झाला.

ललित घोगले या प्रोत्साहनामुळे भारावून गेले होते आणि त्यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानत आशीर्वाद घेतले.

वंचित आघाडीच्या उमेदवार ललित घोगले यांना शहरभर चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, अर्जुन पाटील, दिगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, गोकुळ सोनवणे, सागर केदार, अंकित मौर्य, अतुल पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने